विद्यार्थ्यांना नागरी सेवेत यश मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रंथालये सुसज्ज हवीत- प्रमोद झिंजाडे - Saptahik Sandesh

विद्यार्थ्यांना नागरी सेवेत यश मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रंथालये सुसज्ज हवीत- प्रमोद झिंजाडे

करमाळा(दि.१९) : विद्यार्थ्यांना नागरी सेवेत यश मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रंथालये सुसज्ज हवीत असे मत महात्मा फुले समाजसेवा मंडळचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी व्यक्त केले. करमाळा वाचनालय स॔घ करमाळा व महात्मा फुले समाजसेवा मंडळ, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने  करमाळा तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

शनिवार दिनांक 18 रोजी दुपारी एक वाजता ज्ञानेश्वर वाचन मंदिर करमाळा येथे झालेल्या कार्यशाळेत महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद (बाबा) झिंजाडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, महाराष्ट्रात सध्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम सर्वत्र चालू आहे याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

सुलेखन-प्रशांत खोलासे (मो. 9881145383)

मार्गदर्शक प्रमोद झिंजाडे बैठकीला मार्गदर्शन करताना म्हणाले की वाचन चळवळ वृंद्धिगत होण्यासाठी  वाचनालयातील कर्मचारी पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात वाचनालयात चळवळीची जनजागृती करावी सध्या ग्रामीण भागातील ग्रंथालयांना इमारत व जागेची समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे ग्रंथालयांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 60: 40 च्या माध्यमातून ग्रंथालयांना इमारत बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडे ग्रामसभेत मागणी करावी व तसा ठराव करावा ग्रंथालयाच्या इमारती सुसज्ज झाल्यास यातून गावातील विद्यार्थी अभ्यास करून नागरी सेवेत दाखल होतील त्यांना अभ्यासासाठी वातावरण निर्मिती करून द्यावी, जास्तीत जास्त वाचक ग्रंथालयाकडे कसे येतील यासाठी ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहेत, ग्रंथालय ही ग्रामीण भागातील गावाची  “माहिती व सेवा केंद्र” बनावीत शासनाच्या योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ग्रंथालयांनी करावे तसेच प्रत्येक गावातून स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी तयार करून त्यांना नागरी सेवेत मोठ्या प्रमाणात यश येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमासाठी  सूत्रसंचालन संजय मोरे ,प्रस्तावित भास्कर पवार यांनी केले  तर आभार विठ्ठल वरकड यांनी मांनले.
       या कार्यक्रमासाठी तालुक्यातून ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!