मंगेश चिवटे यांच्याकडून नागनाथ मतिमंद विद्यालयास गणवेश भेट

केम(संजय जाधव): महाराष्ट्र राज्याचे उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्याकडून नागनाथ मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना एकूण ३० गणवेश वाटप करून त्यांना मिष्ठान्न देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मंगेश चिवटे होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक चव्हाण यांनी केले. त्यांनी शाळेबद्दलची माहिती सांगितली.
यावेळी मंगेश चिवटे म्हणाले कि, मी आज प्रथमच या शाळेत आलो आहे.हि शाळा पाहून मला समाधान वाटले मी या विद्यार्थ्यांना जी मदत केली त्याचे मला या विदयार्थाकडे पाहून हि मदत सार्थक झाली असे वाटते. ज्या लोकांना सामाजिक काम करताना मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी अशा शाळांना मदत करावी.
या वेळी गणेश चव्हाण, शहाजी कोंडलकर, धुळदेव शेंबडे, महेंद्र सरक, आनंद बेरड, उपसरपंच सागर कुरडे,पै अभिजीत तळेकर सदस्य विजय ओहोळ, दिपक पाटणे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रविंद्र पाटिल यांनी केले तर आभार मुखयाध्यापक हिरालाल नाळे यांनी मानले.






