करमाळा येथे तालुकास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन

करमाळा(दि.१०) : माजी आमदार कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांच्या जयंती निमित्त करमाळा येथे तालुकास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज दिनांक 10 मार्च रोजी करमाळा शहरातील दत्त पेठेतील गुरुप्रसाद मंगल कार्यालय येथे सायंकाळी ५:३० ते ७ यादरम्यान ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
या स्पर्धेत पहिल्या दहा स्पर्धकांना बक्षीस विशेष मानधन दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी माजी आमदार संजय मामा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कर्मवीर अण्णासाहेब जगताप कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ व श्रीकृष्ण कन्स्ट्रक्शन करमाळा यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम पार पडणार असून एस एस फिटनेस क्लब करमाळा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.






