कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या शिक्षेच्या निषेधार्थ करमाळयात सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली २७ मार्चला जेलभरो आंदोलन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याच्या निषेधार्थ करमाळयात कॉंग्रेस पक्षाचे नेते सुनीलबापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी २७ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जेलभरो आंदोलन करण्यात येणार असुन सर्व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कॉंग्रेस पक्षाचे नेते सुनीलबापु सावंत यांनी केले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,खासदार राहुल गांधी यांनी ‘चोरी का सर नेम मोदी ही क्यों होता है’ या वक्तव्यावरून न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, खासदार राहुल गांधी यांना केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकार घाबरत आहे, त्यांच्या पायाखालची वाळु घसरत चालली आहे, भारत जोडो पदयात्रेमुळे देशातील सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल आपुलकी निर्माण झाली आहे.
त्यामुळे भाजप सैरवैर झालेले दिसत आहे, आणि म्हणुनच कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारे अडकवण्याचा हा डाव आहे, लोकशाही वाचविण्यासाठी न्याय व्यवस्था आबादित राहण्यासाठी सर्व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कॉंग्रेस पक्षाचे नेते सुनीलबापु सावंत यांनी केले आहे. या दिलेल्या निवेदनावर कॉंग्रेस पक्षाचे दस्तगीर पठान फारुक जमादार, औदुबर उबाळे, मझहर नालबंद, संभाजी गायकवाड़ राजेन्द्र वीर सिंकदर सय्यद राजेन्द्र कसाब आदी च्या सहया आहेत.