श्रमदानातून 'जनशक्ती' संघटनेने सुरू केले निमगाव (टें) - उपळवाटे - केम रस्त्याचे काम - अतुल खूपसे-पाटील - Saptahik Sandesh

श्रमदानातून ‘जनशक्ती’ संघटनेने सुरू केले निमगाव (टें) – उपळवाटे – केम रस्त्याचे काम – अतुल खूपसे-पाटील

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : निमगाव टें – उपळवाटे – केम रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावरून प्रवाशांना जिकरीने प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने काल (दि.२४) रोजी जनशक्ती संघटनेच्या वतीने या रस्त्यावर मुरूम भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. श्रमदानातून डागडुजी होत असलेल्या या रस्त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसहित गावकऱ्यांनी या श्रमदानाला हातभार लावला आहे. अनेकांनी ट्रॅक्टर, डिझेल, टिपर, जेसीबी अशा मशिनींचे सहकार्य केले असल्याची माहिती जनशक्ती संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अतुल खूपसे पाटील

याविषयी अधिक माहिती देताना खूपसे-पाटील म्हणाले की, रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय व खड्डेयुक्त असल्याने शेतकरी, दूधवाले, शाळकरी मुले अशा वाटसरूंना जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास होत होता. खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. किंबहुना आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार संजय शिंदे यांचा या रस्त्यावर नेहमीचाच वावर आहे. ते या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा होती, मात्र कार्यकाळ संपत आला तरी देखील या रस्त्याला निधी उपलब्ध होऊ शकला नाही. हे पाहून जनशक्ती संघटनेने श्रमदानातून हा रस्ता तयार करण्याचे हाती घेतले.

जनशक्तीच्या या श्रमदान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वादविवाद होऊ नये यासाठी अगोदरपासूनच पोलीस पथक तैनात होते. शिवाय उप अभियंता पी.के., शाखा अभियंता आर. व्हि. डेंगले, मंडलाधिकारी एस.सि. डिकोले, तलाठी एल. जि.मोगल, ग्रामसेवक एच.ए.बनाते आदी प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यांनी या रस्त्यावर पाणी मारण्यासाठी टँकर, व टाकलेल्या मुरमावर फिरवण्यासाठी रोलरची तजवीज केली.

हे श्रमदान आंदोलन यशस्वी करण्यासाठी माढा लोकसभा शिवसेनेचे नेते संजय कोकाटे, माजी सरपंच सतिश शिरस्कर, माजी उपसरपंच प्रकाश खूपसे, संपर्कप्रमुख रेश्मा राऊत, संपर्क प्रमुख गणेश वायभासे, नितीन जगताप, आबा मस्के, बिबीशन शिरसाट, राज कणसे, बाबाराजे कोळेकर, गणेश ढोबळे, शरद एकाड, अतुल राऊत, बालाजी तरंगे, रामराजे डोलारे, बापू धोत्रे, मोहन गायकवाड, विजय खुपसे, दीपक खूपसे, विशाल खूपसे, शुभम गायकवाड, अक्षय देवडकर, कल्याण गवळी, रोहन नाईकनवरे, वैभव मस्के, साहेबराव विटकर, विशाल खूपसे, दत्तात्रय खूपसे, संतोष खूपसे, दीपक खूपसे, गणेश सुनील खूपसे, अभिमान गायकवाड , संजय मोळ्या जाधव, लक्ष्मण जाधव, दिलीप जाधव, सुरेश देवडकर, प्रभाकर घाडगे, हनुमंत चव्हाण, राजाभाऊ देवडाकर ,नवनाथ जाधव ,अशोक जाधव, शिवाजी जाधव, सुनील जाधव, सचिन घाडगे सुहास देवडकार संजय माळी गणेश माळी,शरद सपाटे,संतोष सपाटे,वैभव काळे व मोठया संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.

निमगाव टें. – उपळवाटे – केम हा रस्ता माढा तालुक्यातील ३६ गावे व करमाळा तालुक्याला जोडणारा आहे. या रस्त्यासाठी शासन व प्रशासनाकडून शिवाय आजी-माजी लोकप्रतिनिधी कडून या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत गेले. कोणत्याही रस्त्याच्या कामासाठी निधी मिळाल्यावर ठेकेदाराकडून अधिकारी व लोकप्रतिनिधी सुद्धा टक्केवारी घेतात. त्यामुळे साहजिकच ठेकेदारांना दुय्यम दर्जाची कामे करून बिले काढावी लागतात. याचा मनस्ताप जनतेला होतो. ज्या जनतेने मतं टाकून या लोकांना निवडून दिले आहे, त्या जनतेला त्रास देण्याचे पाप लोकप्रतिनिधी कडून होत आहे ही दुर्दैवाची बाब आहे.
अतुल खूपसे पाटील
संस्थापक जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!