शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन
करमाळा (दि.२६) – सोलापूर जिल्हा परिषदेच्या तसेच राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत अशा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटना सोलापूर यांच्या वतीने महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन यांना सदर मागण्यांचे निवेदन जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा नेते तात्यासाहेब जाधव, करमाळा तालुकाध्यक्ष अरुण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व जुनी पेंशन संघटनेचे सदस्य व हिवरवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नितीन व्हटकर यांनी दिले. दहिवडी (जिल्हा सातारा) या ठिकाणी गोरे यांना हे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी करमाळा भाजपचे सरचिटणीस जितेश कटारिया संजय घोरपडे,श्याम सिंधी, विजय नागवडे उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने एक नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार होवून निर्णय व्हावा तसेच मागील नऊ महिन्यापासून शिक्षकांच्या पगारातून कपात होणारी रक्कम एनपीएस खात्यात वर्ग होत नाही विज्ञान विषय शिक्षकांना तात्काळ वेतनश्रेणी देण्यात यावी जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करण्यापूर्वी अगोदर संपूर्ण राज्यात पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात यावी. शाळांचे निधी अभावी वीज बिल थकलेले आहेत त्यामुळे विज बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. संचमान्यता पूर्ण करून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करून प्रक्रिया पूर्ण करावी.शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा.शाळा दुरुस्तीसाठी योजनांचा निधी ग्रामपंचायतकडे वर्ग न करता शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करावा एक नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात असणाऱ्या शिक्षकांचे जीपीएफ खाते उघडण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात असणाऱ्या शिक्षकांचे एनपीएस खाते बंद करून जीपीएफ खाते त्वरित उघडण्यात यावे.
● तात्यासाहेब जाधव, जिल्हा नेते सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटना