न. प .मुला-मुलींची शाळा नंबर 4 शाळेचे क्रीडा स्पर्धेत सुयश

करमाळा (दि.२६) : नगरपरिषद शिक्षण मंडळ करमाळा अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये न. प .मुला मुलींची शाळा नंबर 4 या शाळेला वैयक्तिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक बक्षिसे मिळाली.
- सांघिक खेळ क्रीडा संचलन – द्वितीय क्रमांक.
- मोठा गट कबड्डी (मुले) – उपविजेता
- लहान गट लिंबू चमचा (मुले) – आरुष संजय वाघमारे द्वितीय क्रमांक.
- संगीत खुर्ची लहान गट मुली – आलीना अजहर काझी प्रथम क्रमांक.
- 100 मीटर धावणे मोठा गट (मुले) – रोहन चरण चव्हाण द्वितीय क्रमांक, आदित्य अमोल दगडे तृतीय क्रमांक
- लिंबू चमचा मोठा गट (मुली) – ऋतुजा करेप्पा वाघमारे प्रथम क्रमांक .
- संगीत खुर्ची मोठा गट (मुली) – आराध्या सुरेंद्र बोकन प्रथम क्रमांक. सृष्टी पांडुरंग शिंदे मुली मोठा गट चमच्या लिंबू तिसरा क्रमांक
- तीन पायाची शर्यत मोठा गट (मुले) – रोहन चरण चव्हाण व श्लोक संदीप क्षीरसागर तृतीय क्रमांक, आदित्य दगडे व राजवीर रजपूत उत्तेजनार्थ.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ चंद्रकला सतीश टांगडे मॅडम शिक्षक श्री संतोष माने सर श्री बाळू सर श्री मुकुंद मुसळे सर श्रीमती आसराबाई भोसले मॅडम यांनी मार्गदर्शन केले सर्व विजेते स्पर्धक विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापक यांचे अभिनंदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री सचिन तपसे साहेब , प्रशासनाधिकारी श्री अनिल बनसोडे साहेब केंद्र समन्वयक श्री दयानंद चौधरी सर .शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री अमोल दगडे उपाध्यक्ष सुरेखा बोरा शिक्षण तज्ञ सौ अंजली श्रीवास्तव मॅडम व शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.




