मांजरगाव येथे उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ग्रामपंचायत मांजरगाव व जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरगाव तसेच उंदरगाव व रिटेवाडी (ता.करमाळा) येथील दहावी व बारावी मधील उत्तीर्ण झालेल्या तसेच विविध शाखांमध्ये उत्तम शैक्षणिक यश संपादन केले आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ उद्या (ता.४) सकाळी साडेआठ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे तरी या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत मांजरगाव जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे तसेच नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत, तरी या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत मांजरगाव जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
