मिनाज घोणे हिची लेखापाल म्हणून निवड - करमाळ्यात सत्कार.. - Saptahik Sandesh

मिनाज घोणे हिची लेखापाल म्हणून निवड – करमाळ्यात सत्कार..

करमाळा : संदेश प्रतिनिधी : करमाळा शहरातील खाटीक गल्ली येथे मुस्लिम खाटीक बक्कर जमात यांच्या वतीने कु. मिनाज उस्मान घोणे हीचा सन 2023 मध्ये वनविभाग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत लेखापाल (aacountant ) म्हणून निवड झाली. या निवडी बद्दल सत्कार समारंभ जमात तर्फे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नफिसा घोणे यांनी केले. शिक्षणाचे महत्व समजावून मुलांना सांगून आपल्या समाजातील पालकांनी मुलांना शिक्षणास प्रवृत्त करावे. मुलींना उच्च शिक्षण कसे द्यावे या विषयी मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती मीनाज घोणे यांनी या पदापर्यंत पोहचण्यासाठी त्यांचा झालेला खडतर प्रवास सांगितला.

ध्येय पूर्तीसाठी घेतलेली मेहनत व या स्थानापर्यंत त्यांना पोहचण्यासाठी त्यांना पाठिंबा देणाऱ्या वडील, भाऊ, बहिणी व वहिनी यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी अली महंमद हाजी फरीद (मुंबई), स्वागताध्यक्ष हाजी मज्जिद घोडके, सत्कार मूर्ती मिनाज घोणे, जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या शिक्षिका सौ. नफिसा घोणे हे उपस्थित होते. सत्कार मूर्ती व उपस्थितांचा सत्कार शाल हार व श्रीफळ देऊन करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी इम्रान घोडके, जाफर घोडके, मुनाफ घोडके, शौकत घोडके, सिराज घोडके, अकबर घोडके, बिलाल घोडके, शब्बीर घोडके, बाँस घोडके, अशपाक शेख, मोहसीन वस्ताद, इम्रान शेख, शहानूर कुरेशी, मुसा कुरेशी, सलमान घोडके, अरमान घोणे, जिदान शेख व आदि कार्यकर्ते उपस्थित राहून परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसीम घोडके यांनी केले तर शहानवाज घोणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!