आमदार शिंदे यांनी दिली नवीन शहा (जवळेकर) हॉस्पिटलला भेट
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा शहरातील शहा हॅास्पिटल (जवळेकर) चे डॉ.राजेश शहा व डॉ.संदेश शहा यांनी आपले करमाळा शहरातील मेन रोडवर असलेले जुने हॉस्पिटल जवळच मेनरोड वर नव्याने बांधलेल्या इमारतीत स्थलांतरित केले आहे. त्या इमारतीच्या नूतनीकरण उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी काल (दि.२७ जुलै) भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी केली.
शहा परिवाराचे आरोग्याच्या दृष्टीने समाजात अतिशय चांगले कार्य सुरू आहे,त्यांनी कोरोना काळात देखील रुग्णांची देवदूत बनून सेवा केली असे मत यावेळी आमदार शिंदे यांनी व्यक्त केले तसेच त्यांच्या हॉस्पिटल व संपूर्ण टीमला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार शिंदे यांचा डॉ.शहा बंधुनी सत्कार करुन आभार मानले.
करमाळा शहरात १९६० मध्ये कै.डॉ.आर.एम.शहा यांनी मेनरोड वर “शहा हॉस्पिटल (जवळेकर)” ची स्थापना केलेली होती. त्यांच्या या व्यवसायात त्यांच्या मुलांनी म्हणजेच डॉ.राजेश शहा यांनी १९९० पासून काम सुरू केले तर डॉ. संदेश शहा यांनी १९९२ पासून सुरू केले. शहा परिवाराच्या वैद्यकीय व्यवसायाला ६४ वर्षे होऊन गेली असून आता त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय नव्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या इमारतीत सुरू केला असून लवकरच तिसरी पिढी सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होईल अशी माहिती शहा परिवाराकडून देण्यात आली.
यावेळी माजी जि.प.सदस्य उद्धव माळी,करमाळा अर्बन बॅंकेचे माजी चेअरमन कन्हैयालाल देवी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ता.कार्यध्यक्ष सुजित बागल,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार,देवळालीचे माजी सरपंच अशिष गायकवाड,स्वीय-सहाय्यक प्रविण शिंदे गुरुजी,जातेगावचे युवा नेते तुषार शिंदे,सागर अंधारे,सोशल मिडीयाचे सुरज ढेरे,राजेंद्र पवार,कृष्णा डोंगरे आदीजण उपस्थित होते.