माढा मतदार संघातील रेल्वे स्टेशन नूतनीकरणासाठी १४.७३ कोटी रु. निधी मंजूर - खासदार नाईक निंबाळकर - Saptahik Sandesh

माढा मतदार संघातील रेल्वे स्टेशन नूतनीकरणासाठी १४.७३ कोटी रु. निधी मंजूर – खासदार नाईक निंबाळकर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : माढा लोकसभा मतदार संघातील रेल्वे स्टेशन हायटेक होणार असून यासाठी तब्बल १४.७३ कोटी रु. निधी मंजूर केला आहे.तसेच जेऊर रेल्वे स्टेशनचा अमृतभारत योजनेत समावेश करण्यात आला असल्याची माहिती खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, माढा मतदार संघातील शेती,सिंचन,रस्ते, नागरी सुविधा यासारखी विकासकामे करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून आपण कुर्डुवाडी व जेऊर रेल्वे स्टेशन येथे लोकांच्या सोईसाठी त्यांच्या मागणीप्रमाणे अनेक रेल्वे थांबे मंजूर केले आहेत. यामुळे या भागातील प्रवाशी खूप समाधानी आहेत. लोकांना रेल्वेच्या सेवेचा अधिकाधिक लाभ व्हावा यासाठी सोलापूर रेल्वे परिमंडळातील जिंती रोड,ढवळस,कुर्डुवाडी या रेल्वे स्टेशन परिसराच्या विकासासाठी तब्बल १४.७३ कोटी रु.निधी मंजूर केला आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपण पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे. हा निधी मंजूर झाल्याने लोकांना उच्च प्रतीच्या नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत याचे मनोमन समाधान आहे.

या मंजूर निधीतून सदर रेल्वे स्टेशन परिसरातील परिभ्रमण क्षेत्र रस्ता,पार्किंग क्षेत्र,पथदिवे,लँडस्केपिंग आणि फलोत्पादन,बाग सजावट, प्रवेशद्वार आणि दरवाजे,दर्शनी भाग आणि उंची,शौचालय, 12 मीटर रुंद फूट-ओव्हर-ब्रिज, कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्म सर्फेसिंग,स्टेशन इमारतीचे नूतनीकरण, जलवाहिनीची कामे, इलेक्ट्रिकल काम, साइनेज बोर्ड, एकात्मिक प्रवासी माहिती आणि सार्वजनिक घोषणा प्रणालीसह दूरसंचार प्रवासी सुविधा प्रवाशांना पुरवण्यात येणार आहेत.आगामी काळात आपण रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी तत्पर राहणार आहोत असेही खा.निंबाळकर यांनी शेवटी सांगितले आहे.

एक खासदार म्हणून खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भूतो न भविष्यती चौफेर विकास कामाचा झंझावात संपूर्ण माढा मतदारसंघात अगदी थोड्या कालावधीत केला आहे.त्यामुळे लोक त्यांच्या कामावर खुश आहेत.

गणेश चिवटे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस, भाजपा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!