करमाळा-अहमदनगर महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर अपघात - दोन्ही चालक जखमी - रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा... - Saptahik Sandesh

करमाळा-अहमदनगर महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर अपघात – दोन्ही चालक जखमी – रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा-अहमदनगर महामार्गावर करमाळा शहरालगत असलेल्या छोरीया टाऊनशिप समोर ट्रक व कंटेनरचा समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी झाले आहेत, हा अपघात आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला असून दोन्ही चालकांवर करमाळा येथे उपचारासाठी पाठवले आहे. या अपघातानंतर या महामार्गावर दोन्ही बाजूला जवळपास २ ते ३ किलोमीटर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

यात हकीकत अशी कि, करमाळा-अहमदनगर महामार्गावर करमाळा शहरालगत असलेल्या छोरीया टाऊनशिप समोर अहमदनगरहून करमाळाकडे भरधाव वेगात येणारा कंटेनर क्र.MH04GF8847 हा येत करमाळाहून अहमदनगरकडे वेगात जाणाऱ्या ट्रक क्र. MH13AX4192 यांचा समोरासमोर आल्यावर जोरात धडक होवून मोठा अपघात झाला आहे.

यामध्ये दोन्ही चालकांना पायाला जखम झाली असून दोघेही उपचारासाठी करमाळा येथे रवाना करण्यात आले आहेत. याप्रसंगी अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलिस तातडीने घटनास्थळी भेट दिली, तसेच या अपघातानंतर या महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. परंतु करमाळा पोलिसांनी वाहतूक कोंडी होवू नये यासाठी प्रयत्न करून दोन्ही बाजूने वाहनांना रस्ता करून दिला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास करमाळा पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!