करमाळा शहरातील सुलभाबेन मेहता यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील वेताळ पेठ येथील रहिवाशी सौ.सुलभाबेन सुनिल मेहता (वय ५०) यांचे १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वा च्या सुमारास निधन झाले. त्यांचे मागे पती, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुनीलशेठ मेहता यांच्या त्या पत्नी तर ‘मेहताज् किचन’चे यश मेहता यांच्या त्या आई होत्या. त्यांचेवर १९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध स्तरावरील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!