अन्यथा 'मोकाट कुत्रे' करमाळा नगरपरिषदेत सोडू : सुनीलबापू सावंत यांचा इशारा.. - Saptahik Sandesh

अन्यथा ‘मोकाट कुत्रे’ करमाळा नगरपरिषदेत सोडू : सुनीलबापू सावंत यांचा इशारा..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२०) : नगरपरिषदेने शहरात मोकाट फिरणारे भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अन्यथा २४ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करमाळा नगरपालिकामध्ये भटके कुत्रे आणुन सोडु असा इशारा सोलापुर जिल्हा कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस सुनीलबापू सावंत यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,करमाळा शहरात मोकाट कुत्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असुन, शहरातील गल्ली बोळात असणारे भटके कुत्रे लहान मुलांना चावा घेत आहेत तर रात्री अपरात्री नागरीकांना रस्त्यावरुन जाताना अंगावर धावून जखमी करत आहेत. सध्या शाळा सुरु होणार असुन लहान मुले शाळेत जाताना भटके कुत्रे मुलांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे वेळीच या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा तसेच सदर कुत्र्याचे निंर्बीजीकरण करण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे, या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सोलापुर व पोलीस निरीक्षक करमाळा यांना पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!