करमाळा तहसील कार्यालयासमोर बहुजन संघर्ष सेनेचे 'बोंबाबोंब आंदोलन' - Saptahik Sandesh

करमाळा तहसील कार्यालयासमोर बहुजन संघर्ष सेनेचे ‘बोंबाबोंब आंदोलन’


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळावा म्हणून बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वा खाली बहुजन संघर्ष सेनेने बोंबाबोंब आंदोलन केले. करमाळा तालुक्याला गेल्या सात महिन्यापासून अधिकृत तहसीलदार नाही, प्रभारी तहसीलदारवरच येथील तहसील कार्यालयाचा कारभार चालत आहे, वेळेत काम होत नसल्याने नागरिक हैराण असल्याने बहुजन संघर्ष सेनेने आमदार संजयमामा शिंदे, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने केले बोबाबोंब आंदोलन करून तहसील कचेरीचा परिसर बोबाबोंब आंदोलनाने दणाणून सोडला होता.

यावेळी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी आंदोलनावेळी बोलताना म्हणाले कि, तसीलदार नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या रस्ता केसचा निकाल वेळेत लागत नाही, जमिनीचे तक्रारीचे निवारण वेळेत होत नाही, रेशन कार्ड वेळेत लोकांना मिळत नाही, अन्नसुरक्षेमध्ये रेशन कार्ड समाविष्ट करण्यात विलंब होत आहे, बारा अंकी नंबर लोकांना दोन चार चार महिने मिळत नाही, पी एम किसान चे पैसे लोकांना वेळेत मिळत नाही, संजय गांधी निराधार चे प्रकरण वेळेत मंजूर होत नाही, निराधार लोकांचे अनुदान वेळेत मिळत नाही, अशी तहसील कचेरी मध्ये असलेलि विविध कामे वेळेत होत नसल्याने तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत.

याकडे आमदार खासदार पालकमंत्र्यांचे लक्ष नाही तहसील कचेरी मध्ये भोंगळ कारभार आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या नावाची लिस्ट तहसील कचेरीमध्ये दर्शनी भागावरती लावावी, ज्यामुळे मराठा समाजातील लोकांना आपले नाव आहे किंवा नाही हे पाहायला मिळेल कुणबी दाखले काढून देणारे दलाल 50 – 50 हजार रुपयाची मागणी मराठा समाजाकडे करतात त्यांचा बंदोबस्त शासनाने करावा व मराठा समाजाला कुणबी दाखले मिळण्याची सोय सुलभ करावी अशी मागणी राजाभाऊ कदम यांनी केली.

लवकरात लवकर तहसीलदार करमाळा तालुक्याला मिळावा जर 15 दिवसांमध्ये तहसीलदार नाही मिळाला तर बहुजन संघर्ष सेना यापेक्षा तीव्र आंदोलन करेल याची शासनाने दखल घ्यावी. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांचे निवेदन नायब तहसीदार काझी यांनी स्वीकारले व वरिष्ठाकडे आपल्या मागणीचे पत्र तात्काळ पाठवतो असे सांगितले. येत्या आठ दिवसात तहसीलदार पदभार स्वीकारतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी पोलिस अधिकारी बिभीषण जाधव गोपनीयेचे श्री.दळवे, पोलिस कर्मचारी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

याप्रसंगी ॲड.राहुल कांबळे, अंगद लांडगे तालुकाध्यक्ष, कालिदास कांबळे करमाळा शहर सचिव,तुकाराम घोंगडे तालुका उपाध्यक्ष, नवनाथ खरात,अधिक शिंदे,विष्णू रणदिवे पोत्रे सरपंच,रवी घोडके आळजापूर सरपंच,मनोहर कोडलिंगे गोंधवडी सरपंच,दत्ता गव्हाणे सरपंच पोफळज,बापू पवार सरपंच केडगाव,संदीप मारकड सरपंच उमरड,दादा गायकावड सरपंच गोयेगाव,दत्ता राक्षे,बटू हजारे,सुंदरदास काळे,चंद्रशेखर पाटील,अर्जुन भोसले,विनोद शिंदे,प्रदीप शिंदे,मनोहर शिंदे,अशोक शिंदे,प्रेमचंद कांबळे,संतोष लांडगे,बापू गायकवाड,दादा गायकवाड,संतोष गायकवाड,मारुती भोसले,शिवाजी कुंभार,गोविंद लांडगे,नागनाथ राऊत,गौतम शिंदे,श्रीरंग लांडगे,पप्पू सरोदे,कैलास सरोदे,हनुमंत सरोदे,कचरू जगदाळे,कैलास कदम,आबा कदम,लखन कदम,भीमराज कदम,हनुमंत खरात,आजिनाथ अवताडे,अमोल कोडलिंगे,संभाजी मारकड,मच्छिंद्र काळे,बापू भोसले,लक्ष्मण भोसले,बबन भालेराव, रमेश भोसले,भाऊ भोसले,अनुप चव्हाण आदि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!