‘नंदन प्रतिष्ठान’च्यावतीने ‘स्नेह संवाद’कार्यक्रम संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कोजागिरी पौर्णिमानिमीत्त नंदन प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी (ता.9) ‘स्नेह संवाद’ नुकताच संपन्न झाला. भाजपा व्यापाऱ आघाडीचे शहराध्यक्ष व नंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेश कटरिया जितेश कटारीया यांच्या पुढाकारातुन जुना बायपास येथील श्रीसंत संताजीनगर येथे हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, घनशाम गांधी, भाजपा युवा मोर्चा सचिव दीपक चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालयचे अमोल मुटके, राज्य परिषदेचे बाळासाहेब कुंभार, तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, सुहास घोलप, शशिकांत पवार, माजी तालुकाध्यक्ष संजय घोरपडे, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, नितीन देवकाते, संजय गांधी निराधार योजनचे नरेंद्र ठाकुर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
सध्याचे युग डिजिटल होत चालले आहे. घरातल्या घरात लोकांचा संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील सहकार्यांना एकत्र आणून संवाद साधने तर लांबच आहे. याच गोष्टीसाठी शहरातील नंदन प्रतिष्ठानच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेला गेल्या वर्षापासून विविध क्षेत्रातील सहकार्यांना एकत्र आणून स्नेहसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रतिष्ठित लोकांना एकत्र आणून संवाद साधण्याचा प्रयत्न करते.
यावेळी प्रतीक ओहोळ, सुयश जाधव, प्राजक्ता गोयेकर, झरे येथील नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालयाला मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष महेश परदेशी, शाम सिंधी, चंद्रकांत राखुंडे, रासपाचे तालुकाध्यक्ष राजशेटें देशमुख, अमर करंडे, मुन्ना हसिजा, अमोल कांबळे, अशोक मुरूमकर, संजय जमदाडे, श्री. निकम, अतुल बोकन, दौंडे मेजर, प्रतिष्ठानचे अमोलशेठ रोकडे, ॲड. विजय तळेकर, निलेश माने, प्रा. दिग्विजय लावंड, डॉ. सतीश गोयेकर, रोहित कोळेकर, अक्षय परदेशी, सचिन चव्हाण, आश्विन जव्हेरी, महमंद भाई उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत प्रकाश क्षीरसागर यांनी केले.