Philately डे च्या निमित्ताने करमाळा पोस्ट कार्यालयास 'देवी विद्यालयाच्या' विद्यार्थ्यांची भेट - Saptahik Sandesh

Philately डे च्या निमित्ताने करमाळा पोस्ट कार्यालयास ‘देवी विद्यालयाच्या’ विद्यार्थ्यांची भेट

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : Philately डे (पोस्ट तिकिटे संग्रह दिवस) च्या निमित्ताने येथील श्री गिरिधरदास देवी विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी भेट दिली.

याप्रसंगी पोस्ट ऑफिस करमाळा येथे मा.डाक अधीक्षक बी लक्ष्मणा व विपणन अधिकारी विष्णु कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली Philately डे विषयी मुलांना माहिती करमाळा सब डीव्हिजनच्या डाकनिरिक्षक मेहता, करमाळा पोस्ट ऑफीसच्या सब पोष्ट मास्टर अडसूळ , शेलार मास्तर, अशोक मोकाशे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आगवणे मास्तर यांनी केले. याप्रसंगी श्री गिरिधरदास देवी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जगताप, सहशिक्षक श्री.नरतडकर तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!