जिद्दीच्या जोरावर हिसरे गावातील नयन वीर यांची पोलिस उपनिरिक्षकपदी निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : हिसरे (ता.करमाळा) येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र नयन पोपट वीर याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.
नयन वीर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल चिखलठाण येथे मामाच्या गावी झाले. बारावी चे शिक्षण वाणिज्य शाखेतून कर्जत येथून झाले व वाणिज्य शाखेची पदवी TC कॉलेज बारामती येथून पूर्ण केली. त्याची आई सौ मंगल वीर या गावातील शाळेमध्ये अंगणवाडी मदतनीस आहेत. नयन वीर याने एमपीएससी चा संपूर्ण अभ्यास कोल्हापूर येथे कोणताही क्लास न लावता केला.
एमपीएससी ची तयारी करत असताना त्याच्या आई-वडिलांनी शेतीत कष्ट करत त्याला साथ दिली.
त्या कष्टाची जाण ठेवून सातत्याने अभ्यास करून नयन ने पीएसआय पदाला गवसणी घातलेली आहे.त्याच्या यशामध्ये नयनला त्याचे मामा, काका , चुलते, बहीण व दाजी असलेले कृषी पर्यवेक्षक निखिल सरडे यांची साथ मिळाली. मिळालेल्या यशाबद्दल गावकऱ्यांनी तसेच आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार नारायणआबा पाटील तसेच माजी सभापती अतुलभाऊ पाटील यांनी अभिनंदन केले.