निंभोरे ग्रामपंचायतीच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

करमाळा (दि.१२) : आज ग्रामपंचायत निंभोरे येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
लोकनियुक्त आदर्श सरपंच रविदादा वळेकर यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नेते भाऊराव वाघमारे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते दिपज्वलन करण्यात आले. तसेच या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष यावेळी करण्यात आला.
यावेळी सरपंच रविदादा वळेकर,उपसरपंच प्रतिनिधी संतोष पाटील,ग्रा.पं.सदस्य विकास वळेकर,दीपक गवळी,अण्णा सावंत पोलिस पाटील केरबा पन्हाळकर,आर.व्ही.ग्रुपचे अध्यक्ष ईश्वर मस्के,पोपटराव वाघमारे,सौदागर वाघमारे,दत्ताभाऊ वळेकर, मधुकर तनपुरे,शंकर मस्के,राजू माळी,राजाभाऊ वळेकर,बापू वळेकर, छगनकाका वाघमारे,ज्ञानेश्वर वळेकर, तात्या सातव,जालिंदर काकडे,कर्मचारी दिलीप मुळे,सुरेश गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




