मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने करमाळ्यात खतना कॅम्प संपन्न – १३५ मुस्लिम बालकांचा सहभाग

0

करमाळा(दि.१):  दरवर्षी प्रमाणे यंदाही मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने मुस्लिम समाजातील लहान बालकांसाठी खतना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये १३५ लहान बालकांनी लाभ घेतला असून सोलापूर चे प्रसिद्ध खतना स्पेशालिस्ट डाॅ,उजेर बेग यांच्या हस्ते खतना करण्यात आल्या असल्याची माहिती मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष फारुक जमादार यांनी दिली.

प्रारंभी मौलाना मोहसीन शेख, मौलाना सिकंदर मुलाणी, बकशभई शेख, अल्लाउद्दीन शेख, मोहसीन नालबंद,जमीर मुलाणी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद, हाजी हमीद सय्यद, अहमद बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत कुराण पठण करुन व प्रार्थना करुन खतना शिबीरास सुरुवात करण्यात आली यावेळी समीर सिकंदर शेख, असीम फिरोज बेग, जावेद दाऊद शेख आदी ची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी मौलाना मोहसीन शेख म्हणाले की, इस्लाम धर्मात खतना ला विशेष महत्त्व आहे मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने दरवर्षी शिबिर आयोजित करून समाजातील बालकांची उत्तम सोय करण्याचे काम या माध्यमातून होत असुन या मध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होते समाजातील गोरगरीब बालकांसाठी अश्या प्रकारे शिबिर राबविण्याची सध्या गरज आहे यापुढे ही असेच सामाजिक उपक्रम राबविले जावेत असे ते यावेळी म्हणाले
या खतना शिबीरास नगरसेवक संजय ( पप्पू) भगवान सावंत, मंडळ अधिकारी युसुफ बागवान, अशपाक सय्यद, हाजी नादीर नालबंद , हाजी कदीरभाई शेख, आदी जणांनी भेट दिली.

खतना कॅम्प यशस्वी करण्यासाठी चाॅंद हाजी फारुक बेग,अकीब सय्यद, फिरोज बेग,पै,साहील शेख, शाहरुख शेख, आफताब पठाण, अरबाज बेग, नदीम शेख, नवाज बेग, जिशान शेख, शाहिद बेग, जमीन सय्यद, समीर दाऊद शेख,जाहीद शेख,हुजेफ कलंदर शेख,हुजेफ जावेद शेख यांनी परिश्रम घेतले

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!