दिपावली निमित्त केम येथे किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन - Saptahik Sandesh

दिपावली निमित्त केम येथे किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम येथील जाणता राजा स्पोर्ट क्लबच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जाणता राजा स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष समीर तळेकर यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, किल्ले बनविताना वीट, दगड, लाल किंवा काळी माती वापरून रंग कामासाठी विविध रंगाची माती अथवा कावेचा वापर करावा. किल्ल्याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीने हवे या स्पर्धेसाठी बक्षीस ठेवणारे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत-

  • प्रथम क्रमांक – . नागनाथ तळेकर (ग्रामपंचायत सदस्य) यांच्या वतीने १००१ रुपये
  • व्दितीय क्रमांक – सामाजिक कार्यकर्ते राहुल कोरे यांच्या कडून ५०१ रुपये
  • तृतीय क्रमांक – समीर दादा तळेकर यांच्या वतीने ५०१ रू
  • चतुर्थ क्रमांक – स्वराज्य मर्दानी खेळ – ४०१ रुपये
  • उत्तेजनार्थ बक्षिसे शिव विचार प्रतिष्ठान – ३०१ रु.
  • नितीन नवनाथ तळेकर २५१ रुपये
  • कै. ज्ञानदेव शंकर जाधव यांच्या स्मरणार्थ – १५१ रुपये
  • स्वराज्य कृषी केंद्र. १०१ रुपये

या स्पर्धेचे बक्षीसं वितरण २४ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत तरी या स्पर्धेत जास्ती जास्त शिवप्रेमी ने सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!