रस्त्याच्या कारणावरून वाद घालून ५० हजार पळविले.. - Saptahik Sandesh

रस्त्याच्या कारणावरून वाद घालून ५० हजार पळविले..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : रस्त्याच्या कारणावरून वाद घालून मारहाण करून ५० हजार रू. ची रक्कम काढून घेतली आहे. अशी फिर्याद योगेश हनुमंत साळुंके रा. सातोली यांनी दिली आहे.

सदर फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, की ५ नोव्हेंबरला सायंकाळी सात च्या सुमारास आमच्या शेतातील ऊस भरून ट्रॉली घेऊन शिवरस्त्याने जात असताना संतोष फरतडे व त्याचे वडील बिभिषण फरतडे याने या रस्त्यावरून पुन्हा जायचे नाही या कारणावरून वाद काढला व वादावादी करून संतोष याने माझ्या खिशातील ५० हजार रू. झटपटीत काढून घेतले आहे. या प्रकरणी पोलीसांनी या दोघांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!