उंदरगाव तरूण मंडळाकडून गावामध्ये दर रविवारी स्वच्छता मोहीम
करमाळा(दि.२): उंदरगाव (ता.करमाळा) येथील तरूण मंडळाकडून गावामध्ये दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेची सुरुवात या रविवारपासून (दि.२) झाली आहे.
उंदरगाव येथे नुकतेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दि १८ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत ग्रामस्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. हे स्वच्छतेचे काम तात्पुरते न राहता कायम पुढे चालू रहावे या उद्देशाने उंदरगाव येथील तरूण मंडळाकडून गावामध्ये दर रविवारी सकाळी ६ ते ९ यावेळेत स्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.
यासाठी मधुकर पाटील, सुनील इंगळे,तुकाराम पाटील ग्रामपंचायत सदस्य समाधान कांबळे, गणेश जावळे, सागर कुंभार, तसेच जिल्हा परिषद शिक्षक नामदेव पाटील, किरण ताकमोगे, सनी कांबळे,धनराज लठे,दशरथ कांबळे, शंकर कांबळे, सरपंच युवराज मगर, समाधान पाटील, दादु जावळे, विजय कांबळे,प्रमोद पाटील,तन्मय लोकरे हे सर्व दर रविवारी सकाळी स्वच्छतादूत म्हणून काम करणार आहेत.