नेरले-गौंडरे रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात

करमाळा(दि.१): करमाळा तालुक्यातील नेरले ते गौंडरे या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. या आधी हा रस्ता पंधरा वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर या आज पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नव्हते. त्यामुळे या रस्त्याची फार दुरवस्था झाली होती.
खराब रस्त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात घडत होते. गौंडरे व नेरले दोन गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. असे असले तरी गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. अखेर या कामात सुरुवात झाल्याने नेरले, गौंडरे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी मा.उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांना मी लेखी निवेदन दिले होते. भाजपच्या महिला आघाडी राज्य उपाध्यक्षा सौ रश्मी दिदी बागल व शिवसेना नेते श्री दिग्विजय भैय्या बागल यांनी देखील या रस्त्यासाठी प्रयत्न केले. तसेच वर्तमान पत्रामध्ये बातम्या आल्या होत्या. याची दखल घेऊन रस्ता मंजूर करून त्याचे काम सुरू केले आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तसेच होणारे काम ठेकेदार अधिकारी यांनी मजबूत करावे.
● औदुंबरराजे भोसले,माजी सरपंच, नेरले (ता.करमाळा)





