मुख्याध्यापक श्री.सरडे यांना स्वाक्षरीची वेतन देण्याचे सोलापूर शिक्षणाधिकाऱ्यांचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री संगमेश्वर विद्यालय संगोबा (ता.करमाळा) येथील मुख्याध्यापक भरत महादेव सरडे यांच्या स्वाक्षरीची वेतन देयके पारित करणेबाबत सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी करमाळा येथील शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश लेखी निवेदनाद्वारे दिले आहेत.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, वरील विषयान्वये श्री.संगमेश्वर विद्यालय संगोबा ता.करमाळा मुख्याध्यापक पदावरील कार्यरत कर्मचारी श्री. भरत महादेव सरडे यांचे संस्थास्तरावरून निलंबन करण्यात आले होते त्याअनुषंगाने कार्यालय स्तरावरून मा. जिल्हा सरकारी वकील सोलापूर यांना मार्गदर्शन मागविण्यात आले होते.
त्यानुसार संदर्भ क्र.01 अन्वये त्यांनी दिलेल्या पत्रात श्री. बी.एम. सरडे यांचे मे. सत्र न्यायालय बार्शी येथे अपिल क्र. 13 / 2019 दि. 02.05.2019 दाखल असल्यामुळे दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 मधिल नियम नं.33 (5) व 33 (6) नुसार मुख्याध्यापक पदावरील हक्क आणि कामकाजापासून वंचित ठेवता येणार नाही. तसेच वादग्रस्त संस्था अधिनियम 1977 मधिल नियम क्र. 04 (6) नुसार कोणतीही कार्यवाही करून शकत नाही. त्यामुळे श्री. सरडे यांना पूर्व पदावर हजर करून त्यांचे वेतन व भत्ते अनुज्ञेय राहतील असा अभिप्राय दिलेला आहे. सदराच्या प्रति करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तसेच अध्यक्ष/सचिव अदिनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, संगोबा यांना पाठविलेल्या आहेत.
श्री.सरडे यांना में करमाळा कोर्टात भा.द.वि. कलम ३५४ अन्वये विनयभंग यामध्ये शिक्षा झाल्याने त्यांना संस्थेने बडतर्फ केलेले आहे, जरी मा.शिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी यांनी यांना राजकीय दबावापोटी बेकायदेशीर पत्र दिलेले असले तरी कर्मचारी नियुक्ती पदाधिकारी ही संस्था आहे. त्यामुळे श्री सरडे यांना रुजू करण्याचा किंवा वेतनावर सहया करण्याचा प्रश्नच येत नाही. हे ज्यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प सोलापूर यांच्या लक्षात आल्यानंतर मा. शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकपदी माझी नेमणूक करून मला कायम केलेले आहे तसे पत्र संस्थेस दिलेले आहे.
– सुनील शिंदे (मुख्याध्यापक, श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा)