जेऊर रेल्वेस्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा – दिपक चव्हाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे रेल्वेस्थानक हे जेऊर रेल्वे स्थानक आहे, या रेल्वेस्थानकावर अनेक गाड्या थांबतात परंतु हुतात्मा एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस याही गाड्यांना या स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापुर यांच्याकडे माजी मंत्री तथा आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दिपक चव्हाण यांनी दिली.

याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून निश्चितपणे जेऊर येथे हुतात्मा एक्सप्रेसला येत्या काही दिवसामध्ये थांबा मिळावण्यासाठ प्रयत्नशील राहू, असे मतविभागीय रेल्वे विभागीय व्यवस्थापक सोलापूर यांनी व्यक्त केले. ही गाडी थांबल्यास पुणे, मुंबई, सोलापूर जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
करमाळा तालुक्यासह जामखेड, कर्जत, परांडा या परिसरातील प्रवाशांची सोय होणार आहे. तसेच केम येथे हैदराबाद -मुंबई व चेन्नई -मुंबई या रेल्वे गाडी ना पूर्वीचा थांबा कायम करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नरेंद्र ठाकूर व आदी मान्यवर उपस्थित होते.




