यशकल्याणी परिवाराच्या दशकपूर्ती वाटचाली निमित्त ‘यशकल्याणी राष्ट्रीय विज्ञान संशोधन पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील यशकल्याणी सेवाभावी संस्थामध्ये वसंतराव दिवेकर स्मृतिदिन व यशकल्याणी परिवाराच्या दशकपूर्ती वाटचाली निमित्त आयोजित ‘यशकल्याणी राष्ट्रीय विज्ञान संशोधन पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन उद्या २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता यशकल्याणी सेवाभवन येथे करण्यात आले असून, यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथे मा.संचालक सी-मेट प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.भारत काळे तसेच प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून जेष्ठ विचारवंत व विज्ञान संशोधक पद्मश्री अरविंदजी गुप्ता तसेच करमाळा येथील डॉ.प्रचिती पुंडे, रिअर ॲडमिरल भारतीय नौसेना रविंद्र नाडकर्णी, सुनिता देवी, जेष्ठ शास्त्रज्ञ सी-मेट, पुणे डॉ.के.जी.कानडे स्त्रीरोग तज्ञ डॉ.वसंतराव पुंडे, विज्ञान संशोधक प्रा.अशोक रूपनेर, डॉ.प्रवीण देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.करे- पाटील यांनी केले आहे.