इरा पब्लिक स्कूल मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यान मालेचे आयोजन…

0


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : चिखलठाण नं १ (ताकरमाळा) येथील इरा पब्लिक स्कूल मध्ये “विद्यार्थ्यांना प्रेरणा व पालकांची जबाबदारी” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा व्याख्याते प्रा.विशाल गरड, कार्यक्रमाचे अध्यक्ष इरा पब्लिक स्कूलचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड, संस्थेचे सचिव सुनील अवसरे, उपाध्यक्ष हरिश्चंद्र बारकुंड, मुख्याध्यापक आनंद कसबे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दादा पोरे, वैभव बोराडे, विकास गव्हणे व आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. व्याख्यानादरम्यान प्रा.विशाल गरड यांनी पालकांच्या जबाबदाऱ्या, विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रासंबंधी असलेली रुची त्यांची आवड, शिक्षकांची जबाबदारी व कर्तव्य अशा चौफेर प्रेरणादायी विचारांनी संपूर्ण वातावरण फुलवून टाकले.

या व्याख्यानमालेबरोबरच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व पालकांसाठी भव्य अशा लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 10 लकी पालकांना शाळेमार्फत विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

त्याचबरोबर प्रशालेतील नर्सरी ते 8 वी पर्यंतचे जे विद्यार्थी संपूर्ण वर्षभरात एकही दिवस गैरहजर राहिले नाहीत अशा तब्बल 10 विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेतील इयत्ता 3 री ते 8 वी पर्यंतच्या बाल-वैज्ञानिकांचे शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी पालकवर्ग देखील बहुसंख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ.ब्रिजेश बारकुंड, सूत्रसंचालन सहशिक्षक सुहास ढेंबरे यांनी तर शेवटी उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थी यांचे आभार मुख्याध्यापक आनंद कसबे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!