घारगाव येथे २९ नोव्हेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – घारगाव (ता.करमाळा) येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन २९ नोव्हेंबर पासून करण्यात आले आहे. या सप्ताह आयोजनाचे मंदिराचे ३३ वे वर्ष आहे.
या सप्ताहात पहाटे ५ ते ७ काकडा आरती भजन, सकाळी ७ ते ८ विष्णू सहस्त्रनाम ८ ते १० ज्ञानेश्वरी १० ते ११ गाथा पारायण सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ ,७ ते ९ हरिकिर्तन सेवा,९ ते १० भोजन पंगत, रात्री १० ते १२ हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताहामध्ये ह.भ.प. रामदास महाराज निंबाळकर रावगाव , ह.भ.प बाळासाहेब शिंदे महाराज अनाळा, ह.भ.प.श्री.सुनिल महाराज महानवर दुधवडी, ह.भ.प.दादा महाराज काळे आरणगाव, ह.भ.प. गोविंद महाराज शिंदे श्रीगोंदा, ह.भ.प. अॅड. डॉ. बाबुराव हिरडे महाराज करमाळा , ह.भ.प.श्री परमेश्वर महाराज खोसे ,या नामवंत किर्तनकारांची हरीकीर्तन सेवा होणार आहेत. कार्यक्रमाचा प्रारंभ दि. २९/११/२०२३ रोजी होणार असून कार्यक्रमांची सांगता ६/१२/२०२३ रोजी सकाळी ०९ ते ११ वा.यावेळेत ह.भ.प. गुरुवर्य योगीराज रणजित बापू महाराज आरणगाव यांचे काल्याचे हरी कीर्तन सेवेने सप्ताह कार्यक्रमाची सागंता होईल. त्यानंतर घारगाव ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद भोजन पंगत होणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ घारगाव यांच्या वतीने केले जाणार आहे. सर्व भाविकांनी संपुर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती भजनी मंडळ, आणि घारगाव ग्रामस्थांनी केली आहे.