केम येथे १२ मे ला रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
केम (संजय जाधव) – केम येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने दि.१२ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक समीर तळेकर व दत्ता तळेकर यांनी दिली.
१२ मे रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत हे शिबिर येथील श्री राम मंदिरात होणार आहे. यावेळी बुधराणी हाॅस्पिटल पुणे यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू, नेत्रतपासणी शिबिर होणार आहे. याचा लाभ गरजुनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले. तसेच आता राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे तरूणांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहान करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीना संसारपयोगी भेट वस्तू देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.