वयाची शंभरी पार केलेल्या बोरगावच्या भिवराबाई भोगल यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : बोरगाव (ता.करमाळा) येथील भिवराबाई भुजंग भोगल यांचं आज (दि.१० मे) राहत्या घरी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुले १ मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
स्व.भिवराबाई भोगल यांनी आपल्या वयाची शंभरी पार केली होती. त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने गावातील, नात्यातील अनेक माणसे जोडली होती. त्यांच्यावर दुपारी १ च्या सुमारास बोरगाव शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश भोगल यांच्या त्या आई होत्या तर वैष्णवी डेअरी चे चेअरमन परमेश्वर भोगल यांच्या त्या आजी होत्या.


