केम येथे वसंत हंकारे यांचे 'न समजलेले आईबाप' या विषयावर व्याख्यान आयोजित - Saptahik Sandesh

केम येथे वसंत हंकारे यांचे ‘न समजलेले आईबाप’ या विषयावर व्याख्यान आयोजित

केम (प्रतिनिधी संजय जाधव) – येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयात सोमवारी दि, (५) सायंकाळी चार ते सहा वेळेत प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे न समजलेले आईबाप या विषयावर व्याख्यान होणार आहे हे व्याख्यान श्री उत्तरेश्वर युवा परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केले आहे

याच कार्यक्रमात ग्रुप च्या वतीने गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या एस,एस,सी, टॅलेंट सर्च परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार सौ शिल्पा ठोकडे, तहसीलदार गणेश तळेकर तहसीलदार विजय तळेकर

या कार्यक्रमासाठी केम व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!