रिटेवाडी येथे महाशिवरात्री निमित्ताने महाप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : रिटेवाडी (ता.करमाळा) येथे जागतिक महिला दिन,राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंती, व महाशिवरात्रीचे औचित्य साधून बहुजनांचा लोकदेव व रिटेवाडी ग्रामस्थांचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या मूर्तीची स्थापना व कलशारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्मकांडाला बाजूला सारून रिटेवाडी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शुक्रवार ८ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता महाप्रसादासोबतच महाप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाप्रबोधन कार्यक्रमासाठी थोर विचारवंत व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी.जी कोळसे पाटील व सुप्रसिद्ध वक्ते इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी करमाळ्याच्या तहसीलदार मा.शिल्पा ठोकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी मा.अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात महिला वर्गासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत व रिटेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!