संगोबा येथे २३ ते २५ डिसेंबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा (दि.२२) – श्री क्षेत्र संगोबा (ता. करमाळा) येथील आराध्य दैवत आदिनाथ महाराज यांच्या मंदिरात सोमवार दिनांक 23 डिसेंबर ते बुधवार दिनांक 25 डिसेंबर या दरम्यान तीन दिवसीय प्रासादिक ग्रंथ मंचरी गाथा पारायण, भजन व अनुष्ठान सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करंजे-भालेवाडी ग्रामस्थ, वै. गुरुवर्य ह भ प आप्पासाहेब वासकर सांप्रदायिक भजनी मंडळ करमाळा व जेऊर परिसर यांनी केलेले आहे.
या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यामध्ये सकाळी ७:३० ते ९, ९:३० ते ११ व दुपारी २ ते ३:३० या वेळेत मंचरी वाचन होणार आहे. हरिपाठ सायंकाळी पाच ते सहा, प्रवचन सायंकाळी ६ ते ७ व किर्तन ७ ते ९ आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
या सोहळ्यास संगोबा, करंजे, भालेवाडी, पाडळी, तरटगाव परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक ह.भ.प.प्रसाद वासकर महाराज, ह.भ.प. कौस्तुभ वासकर महाराज व ह.भ.प. देवव्रत वासकर महाराज यांनी केले आहे.