सरपडोह जि. प. शाळेच्या खो-खो संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

करमाळा (दि.२०) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरपडोह या शाळेच्या खो-खो (मुले-मोठा गट) संघाने तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धा दिनांक 18 डिसेंबर रोजी केम येथील राजाभाऊ तळेकर माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आल्या होत्या.
अत्यंत चुरशीच्या सामन्यात कर्णधार सोहम भिताडे व उपकर्णधार विशंभू पवार यांनी चमकदार कामगिरी करत रावगाव व कुंभेज च्या संघाचा पराभव केला.विजयी संघाला विजेतेपदाची ट्रॉफी व प्रमाणपत्र विस्तार अधिकारी कदम व मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आले.

तालुकास्तरिय खो-खो खेळात विजेते पद मिळवल्याबद्दल विजयी संघाचे व मार्गदर्शक शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण अडसूळ सर,दादासाहेब सोरटे सर, धनराज गदादे सर, दादासाहेब माळी सर, अनुपमा वणवे व मंगल गुंड यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक गवारे, सदस्य मनोहर रंदवे, शरद घोगरे व तंटा मुक्त समिती अध्यक्ष नागनाथ भिताडे व सर्व ग्रामस्थांनी सलग दुसऱ्या वर्षी संघ जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी पात्र झाल्याबद्दल अभिनंदन केले. विजयी संघाला बहुमोल मार्गदर्शन व नियमित सराव करून घेत असल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण अडसुळ सर यांचा व विजयी संघाचा गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील जिल्हास्तरीय कामगिरी साठी शुभेच्छा देण्यात आल्या.




