आकांक्षा क्षीरसागरची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

करमाळा (दि.२०) – सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत नुकत्याच झालेल्या करमाळा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मुली मोठा गट बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात जि.प. शाळा पोफळजची विद्यार्थिनी कु.आकांक्षा तानाजी क्षीरसागर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिची जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नियमित सराव घेत आदर्श शिक्षिका रेखा शिंदे-साळुंके मॅडम यांनी आकांक्षाला मार्गदर्शन केले. चिखलठाण च्या केंद्रप्रमुख वंदना पांडव यांनी आकांक्षाला रोख रकमेचे बक्षीस देऊन तिचा गौरव केला. करमाळा पंचायत समिती चे
गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे , यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, विस्ताराधिकारी नितीन कदम, पोफळजचे सरपंच मा. कल्याण बापू पवार, मा.सरपंच दत्तात्रय गव्हाणे, उपसरपंच राणी गव्हाणे, व्यावसायिक बिभिषण शेठ गव्हाणे, चिखलठाण केंद्रप्रमुख वंदना पांडव, शाळा व्य. समिती अध्यक्ष राहूल धुमाळ, दत्तात्रय पवार सर, मारुती पवार, मेजर सचिन पवार, अरुण पवार,अक्षय कुलकर्णी, उत्तरेश्वर कांबळे, विस्ताराधिकारी मिनीनाथ टकले, मा.केंद्रप्रमुख भारत पांडव, केंद्र प्रमुख वैशाली महाजन, केंद्र प्रमुख रमाकांत गटकळ ,जेऊरचे केंद्रप्रमुख लक्ष्मण भंडारे, केंद्रप्रमुख आदिनाथ देवकाते ,केंद्रप्रमुख साईनाथ देवकर , केंद्रप्रमुख संजय मुंडे सतीश चिंदे यांनी तिचे अभिनंदन केले.

पोफळज शाळेची गुणवत्ता चांगली असून सहशालेय उपक्रमतील विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग उल्लेखनीय असतो. केंद्रप्रमुख म्हणून शाळेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जाते.
● वंदना भारत पांडव, केंद्रप्रमुख चिखलठाण केंद्र
शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत . सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेत आहेत . पोफळज ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे मोलाचे सहकार्य मिळते त्यामुळे शाळेची प्रगती होत आहे .
● मुमताज फकीर, मुख्याध्यापिका
जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील प्रज्ञावान मुलांना विशेष ओळख मिळते. अशा खेळांमुळे मूले सुयोग्य विचार व तर्कबुद्धीचा दैनंदिन जीवनात उपयोग करतात. यापुढील काळात ग्रामस्थांच्या सहकार्याने खेळाच्या आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.
● रेखा शिंदे-साळुंके, मार्गदर्शक शिक्षिका पोफळज




