करमाळ्यात ‘दिव्य ज्योति जाग्रति संस्थान’ मार्फत 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान ‘श्री हरिकथा ज्ञानयज्ञ’ सोहळ्याचे आयोजन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा शहरात दिव्य ज्योति जाग्रति संस्थान मार्फत ‘श्री हरिकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन श्रावण नगर, कमलादेवी रोड, करमाळा शहरात करण्यात आले आहे. तरी करमाळा शहरातील सर्व नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहुन या दिव्य संगितमय श्री हरिकथा ज्ञानयज्ञ सोहळयाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
दिव्य ज्योति जाग्रति संस्थान एक सामाजिक व आध्यात्मिक संघटन आहे, संस्थानचे संस्थापक व संचालक सर्वश्री आशुतोष महाराज असुन, संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगिन विकासासाठी सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याच श्रृंखले अंतर्गत करमाळा शहरात श्री हरिकथा ज्ञानयज्ञ सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संत महापुरुषांच्या जीवन गाथा व भजनांच्या आधारे पुढील मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. (ग्रंथानुसार ध्यानाची (Meditation) शाश्वत पध्दत, ग्रंथानुसार ईश्वर प्राप्ती करुन देणारा भक्तीचा शाश्वत मार्ग, भारतीय संस्कृती, देशभक्ती, समाजसेवा व मनुष्यत्वाच्या दिव्य गुणांना जाग्रत करणारी भक्तीची शाश्वत प्रक्रिया, वर्तमानकाळात ईश्वर दर्शन संभव, भक्तीसाठी गुरुची आवश्यकता, मनुष्य जीवनासाठी भारतीय देशी गाईचे महत्त्व अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम करमाळा शहरात लोकसमूहाच्या सहकार्यातून होत आहे, यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच करमाळा शहरातील व्यापारी वर्ग , तसेच समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे. तरी करमाळा शहरातील सर्व नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहुन या दिव्य संगितमय श्री हरिकथा ज्ञानयज्ञ सोहळयाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.