यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक परिषदेचे आयोजन..
करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा यांच्या वतीने व इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स ॲन्ड रिसर्च, नवी दिल्ली प्रायोजित ‘योगा न्यूट्रीशन सायंटिफिक ट्रेनिंग मेथड्स् ॲन्ड रीहॅबिलीटेशन फॉर ॲव्हॉइडिंग ॲट्रक्शन ऑफ डोपिंग इन स्पोर्टस्’ या विषयावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
24 व 25 मार्च असे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार असून सदर उद्घाटन समारंभास विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष, प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या कुलसचिव डॉ. योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणापुरे, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रेणीक शहा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेमध्ये डॉ. राजेशकुमार, हैद्रबाद, डॉ. अभिनीत जगताप, डॉ. स्नेहल पेंडसे सोलापूर, डॉ. मनाली काने नागपुर, डॉ. योगेश थोरात, सोलापूर डॉ. प्रदीप देशमुख, लातूर. डॉ. शत्रुंजय कोठे, छत्रपती संभाजीनगर हे भारतीय तर डॉ. गॅरी कुआन, मलेशिया आणि डॉ. अनोमा रत्ननायके, श्रीलंका हे परदेशी अभ्यासक आपले शोध निबंध सादर करणार आहेत.
अंमली पदार्थाचे सेवन अर्थात डोपिंग या गंभीर आणि महत्वपूर्ण विषयावर विचारमंथन करून उपाययोजनात्मक निष्कर्षाप्रत दिशादर्शन करणाऱ्या या परिषदेस देशभरातून 150 अभ्यासक उपस्थित राहणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिक्षेत्रातील सर्व क्रीडा विषयाचे अभ्यासक आणि प्राध्यापक वर्गाने सदर परिषदेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन सदर परिषदेचे समन्वक आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. अतुल लकडे यांनी केले आहे.