झरे येथील डॉ.बापू काळे यांचे निधन.. - Saptahik Sandesh

झरे येथील डॉ.बापू काळे यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : झरे (ता.करमाळा) येथील रहिवासी डॉ.बापू काळे (वय 46) यांचे अल्पशा आजाराने काल बुधवार 22 मार्चला सायंकाळी पाच वाजता निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी आणि दोन भाऊ असा परीवार आहे. त्यांनी वीस वर्ष पाटस शहरासह तालुक्यातील रुग्णाची सेवा केली. त्यांच्या अकाली निधनामुळे झरे गावावर शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी विविध स्तरावरील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!