केम येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन

केम (संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर बाबांचे बंधू श्री घुटकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार होत असून, त्यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक समाधान बिचितकर यांनी दिली.

या कार्यक्रमांतर्गत संगीतमय शिवमहापुराण कथेचे वाचन होणार असून, ह.भ.प. रविंद्र महाराज परेराव (सोयगाव जि. छ. संभाजीनगर) हे कथावाचन करतील. त्यांना बॅंजोवर सुनील वामनोद महाराज, तबल्यावर पुरुषोत्तम राऊत महाराज आणि ऑर्गनवर भूषण पाटील महाराज साथ देतील.
२ मे रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान नंदी पूजन व केम गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तर सायंकाळी ५ वाजता ग्रंथ पूजन होणार आहे.

२ मे ते ८ मे दरम्यान कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
- दररोज सकाळी ८ ते ९ श्रींचा अभिषेक
- शिवलीलामृत पारायण सकाळी ९ ते ११
- सायंकाळी ६ ते ९: संगीतमय शिवमहापुराण कथा प्रारंभ
- रात्री ९ ते १०: भोजन

दि. ९ मे रोजी असणाऱ्या कार्यक्रमाचे वेळापत्रक
- सकाळी ७ ते ९.३०: श्रींचा लघुरुद्राभिषेक
- सकाळी ९.३० ते १०: कलशारोहण – श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते पूजा
- सकाळी १० ते १२: ह.भ.प. रविंद्र महाराज यांचे कीर्तन
- दुपारी १२.०५ वाजता: पुष्पवृष्टी
- त्यानंतर सप्ताहाचा समारोप व महाप्रसाद वितरण
या कार्यक्रमाचा लाभ केम व परिसरातील सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केम ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल घुटकेश्वर शिवभक्तांनी त्यांचे आभार मानले आहेत.



