जिंती येथे आयुर्वेद होमियोपॅथी योग निदान व उपचार शिबीर तसेच महिला आरोग्य जनजागृती मेळाव्याचे आयोजन.. -

जिंती येथे आयुर्वेद होमियोपॅथी योग निदान व उपचार शिबीर तसेच महिला आरोग्य जनजागृती मेळाव्याचे आयोजन..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : आयुषग्राम जिंती आयोजीत व करमाळा मेडिकोज गिल्ड यांच्या सहकार्याने आयुष आयुर्वेद होमियोपॅथी योग निदान व उपचार शिबीर तसेच महिला आरोग्य जनजागृती मेळाव्याचे आयोजन २२ मार्च रोजी करण्यात आले आहे. प्रोजेक्ट निदान मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनिषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतील उपक्रम अंतर्गत ‘स्तनांचा कर्करोग तपासणी शिबीर’ चे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिरामध्ये आयुर्वेद तज्ञ, अग्निकर्म तज्ञ, रक्तमोक्षण तज्ञ, होमियोपॅथी तज्ञ योग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ स्त्रीरोग तज्ञ, दंत चिकित्सा इत्यादी सुविधा व तज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत तसेच शिबीरिमध्ये आयुष आरोग्य विषयक भारूड आयोजित करण्यात आले आहे. महिलांमाठी महिलांचे योगग्जोनिवत्ती मध्ये घ्यावयाची काळजी, अतिजोखमीच्या गरोदरमाता, वीवंध्यत्व व त्यावरील उपचार, महिला आरोग्य समुपदेशन या विषयांवर तज्ञ डॉक्टरांचे व्याख्याने आयोजीत करण्यात आली आहेत. पुणे विभागामधून जिंती ची निवड आयुषग्राम योजना झालेली असुन हया आयुषग्राम योजने अंतर्गत सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

आयुर्वेद व योग शास्त्राचा दैनंदिन जीवनामध्ये असणारी उपयोगिता व आयुष चिकित्सा पध्दतीचा प्रचार व प्रमार मोठ्या प्रमाणात होण्यासाठी व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आयुर्वेद पोहचन्यासाठी सदर शिबिराचे आयोजन केले आहे, तरी जिंती व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आयुष शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती मणिषा आव्हाळे यांनी केले आहे.

जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे यांच्या निर्देशानुसार जिंती येथे दवाखान्यामध्ये दररोज योग सत्र चालू असून या दैनंदिन योग सञचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदर शिबीरासाठी अध्यक्ष्य म्हणुन श्रीमती मणिषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर हया उपस्थित राहणार असुन प्रमुख उपस्थिती डॉ.संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सहास माने जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ श्रीकांत कुलकर्णी, निवासी वैदयकिय अधिकारी डॉ.अनिरूध्द पिंपळे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी मनोज राऊत, डॉ.श्रीमती कोमल शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबासाहेब गाढवे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!