शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी सहाय्यकामार्फत करून घ्यावेत : महेश चिवटे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वादळ व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करमाळा तालुक्यात वेगाने सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महसूल विभाग कृषी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग मिळून एकत्रित या सर्व नुकसानीचे पंचनामे करत आहेत, शेतकऱ्यांनी जागृत राहून आपल्या शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी सहाय्यकमार्फत करून घ्यावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.
पंचनामे होत नसल्यास शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान शिवसेनेच्यावतीने केले आहे, असेही श्री.चिवटे यांनी म्हटले आहे. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव व तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
सतराशे एकर क्षेत्रावरील केळीचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, डाळिंब आंबा आधीच सर्व प्रकारच्या फळबागांचे पंचनामे सुरू आहेत, घराचे नुकसान झाले संदर्भात बांधकाम विभाग करमाळा मार्फत पंचनामे सुरू आहे.
–विजयकुमार जाधव (प्रभारी तहसीलदार करमाळा)
करमाळा तालुक्यात केळी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाच्या आदेशानुसार पंचनामे सुरू आहेत.दोन दिवसात सर्व पंचनामे पूर्ण होतील पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाचा अहवाल पाठवला जाईल.
– संजय वाकडे (तालुका कृषी अधिकारी करमाळा)