केम येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन - ३१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस - Saptahik Sandesh

केम येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन – ३१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस

केम : (संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथे 1 मे महाराष्ट्र दिनी श्री ऊत्तरेश्वर चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक सोमनाथ अवघडे व जमीर पठाण यांनी दिली. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ३१००० रू, व्दितीय क्रमांकाचे बक्षीस २१००० रू., तृतीय क्रमांकाचे बक्षीस ११००० रूपये तर चतुर्थ बक्षिस ७०००रु विजेत्यांना देण्यात येणार आहे.

या स्पर्धा १ मे रोजी सकाळी १० वाजता जुनी आश्रम शाळा, केम-उपळवाटे- टेंभुर्णी रोडवर होणार आहेत. अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्याचे आयोजकांचे पहिलेच वर्ष आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस ३१००० रू विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब देवकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे. व्दितीय क्रमांक बक्षीस २१००० रू. युवा उद्योजक कृष्णा राऊत यांच्याकडुन, तृतीय क्रमांक बक्षीस ११००० रूपये ए.पी.ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील व पै. महावीर आबा तळेकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे. चतुर्थ बक्षीस विश्वास आणा तळेकर (हाॅटेल शेतकरी राजा) यांच्यावतीने देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य – गोरख पारखे असून
बाॅल सौजन्य- अनिल तळेकर हे असणार आहेत. वैयक्तिक बक्षीस पुढीलप्रमाणे आहेत.

  • प्रत्येक मॅन ऑफ द मॅच चषक – शिवाजी संजय पाटील
  • मॅन ऑफ द सिरीज २१०० रू चषक – शुभम साखरे व संकेत कुरडे
  • उत्कृष्ट फलंदाज १००० रुपये – गणेश दुर्गळे
  • उत्कृष्ट गोलंदाज १००० रू – राजेश काॅम्पुटर सेंटर केम,
  • उत्कृष्ट झेल – १००० रू. – विष्णू तात्या अवघडे
  • शिस्त प्रिय संघ १००० रु.- काकासाहेब चव्हाण
  • सलग चार षटकार. १००० रू – नितीन गाडे
  • सलग पाच चौकार. १०००रू -वसीम शेख
  • सलग तीन षटकार. १०००रू. – संदिप (पिनू) तळेकर

करमाळा, माढा तालुक्यातील जास्तीत जास्त संघांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक सोमनाथ अवघडे व जमीर पठाण यांनी केले तसेच स्पर्धेच्या नोंदणी साठी संपर्क करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!