रावगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सन 2022 -23 मध्ये घेण्यात आलेल्या तालुकास्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धेत पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव (ता.करमाळा) यांनी सर्वच क्रीडा प्रकारात भाग घेऊन उत्तुंग असे यश संपादान केलेले आहे.
यामध्ये मैदानी स्पर्धा, हॉलीबॉल, बुद्धिबळ, योगासने, कराटे, तायक्वांदो ,कुस्ती,योगासने या सर्व खेळांमध्ये नाविन्यपूर्ण प्रावीण्ये मिळवलेले आहे, हॉलीबॉल स्पर्धा भारत हायस्कूल जेऊर येथे संपन्न झाल्या यामध्ये प्रथम क्रमांकाने संघ विजयी होऊन सोलापूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी या संघाची निवड करण्यात आली आहे.
तसेच कुस्ती या स्पर्धेत जिल्हा स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड होऊन याही स्पर्धा जेऊर येथील भारत हायस्कूल येथे पार पडल्या, वाय. सी. एम .कॉलेज करमाळा येथे येथील मैदानावर झालेल्या 600 मीटर धावणे, रिले यामध्ये स्पर्धकांनी यश संपादन करून जिल्हा स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड झालेली आहे तसेच मैदानी स्पर्धेमध्ये लंगडी, थाळीफेक यामध्येही उत्तुंग असे यश संपादन करण्यात आलेले आहे.
योगासने या स्पर्धा महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे पार पडल्या यामधील विजेत्यांची निवड जिल्हा पातळीवर झाली आहे,सर्व स्पर्धकांना क्रीडा शिक्षक प्रताप बरडे व मुख्याध्यापक कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले या झालेल्या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांनी उत्तुंग असे यश संपादन केल्यामुळे त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.