जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत करमाळ्यातील मूकबधिर शाळेचे सुयश - राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड - Saptahik Sandesh

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत करमाळ्यातील मूकबधिर शाळेचे सुयश – राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग यांच्या वतीने ३ जानेवारी रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन सोलापूर येथे करण्यात आले होते.

सोलापूर येथील नेहरू नगर मधील श्री शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या क्रीडा स्पर्धेत अंध, मतिमंद,  मूकबधीर, अस्थिव्यंग या प्रवर्गातील एक हजार तीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध ८० प्रकारच्या क्रीडा स्पर्धा इथे पार पडल्या.

या स्पर्धेत देवीचामाळ (ता.करमाळा) येथील श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये वयोगट 8 ते 12 वयोगटात मध्ये 50 मीटर धावणे निहाल शेख प्रथम क्रमांक, वयोगट 12 ते 16 मध्ये कु. श्रेया जगताप गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक व कुमारी आरती चेडे हिने 16 ते 18 वयोगटात लांब उडीत प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी अनुजा तोरडमल हिने 8 ते 12 वयोगटात लांब उडीत द्वितीय क्रमांक पटकावला, तोहित शेख याने 12 ते 16 वयोगटात लांबउडीत द्वितीय क्रमांक व तोहित शेख याने 12 ते 16 वयोगटात लांबउडीत द्वितीय क्रमांक व वयोगट 16 ते 18 मध्ये कुमारी आरती चेडे हिने गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. कु. सुषमा मरळ हिने 16 ते 18 वयोगटात 200 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय व 400 मीटर धावणे स्पर्धेत द्वीतीय क्रमांक पटकावला.

सांस्कृतिक स्पर्धेत ” हळद लागली मल्हारी पिवळा ” झाला या गीतावर विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री ज्ञानदेव गुरमे व श्री तानाजी कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे सचिव चित्रसेन पाथरूट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ पाथरूट व शाळेच्या मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Success of Deaf and Dumb School in Karmala in district level sports and cultural competition – selection for state level competition |

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!