स्वातंत्र्यदिनानिमित्त पांगरे ग्रामपंचायत कार्यालय इमारत भूमीपूजन संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पांगरे (ता.करमाळा) ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी घेण्यात आला. पांगरे ग्रामपंचायत कार्यालयासाठी स्वतंत्र अशी इमारत नव्हती. ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधण्यासाठी सरपंच प्रा. डॉ. विजया दत्तात्रय सोनवणे यांची सरपंच पदी निवड झाल्यानंतर इमारत बांधण्याबाबत आश्वासन दिले होते.
अश्वासन पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करून इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला आहे. त्यासाठी मा. अजितदादा तळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. इमारतीचे भूमिपूजन 15 ऑगस्ट रोजी गावातील अनेक प्रतिष्ठित गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यानिमित्ताने लवकरात लवकर इमारत पूर्ण होईल याचीही ग्वाही सरपंच यांच्याकडून देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश वडणे, मा. उपसरपंच सचिन पिसाळ, सदस्य भैरवनाथ हरळे, धनंजय गायकवाड, विवेक पाटील, हरिदास टेकाळे, आदिनाथचे माजी संचालक ॲड. दत्तात्रय सोनवणे, सहदेव दोंड, ज्योतीराम तोबरे, तुकाराम गुटाळ, चांदेव गुटाळ, महेश शेळके, बाबासाहेब पवार, सुधीर दोंड, भारत टेकाळे, प्रताप पारेकर, रामेश्वर पारेकर, हनुमंत पारेकर, गोरख सोनवणे, पो.पा. युवराज सावंत, ग्रामसेवक समाधान कांबळे, गाव कामगार तलाठी गौरव कुलकर्णी, गोपाळ कोळी, मच्छिंद्र उघडे, पप्पू धेंडे, वैद्यकीय अधिकारी घायाळ मॅडम, कृषीसहायक सरडे मॅडम, कुलकर्णी मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.