वरकुटे येथे स्व.हरिभाऊ भगवान दिरंगे गुरुजी यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वरकुटे (ता.करमाळा) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्व. हरिभाऊ भगवान दिरंगे गुरुजी यांच्या स्मरणार्थ इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी, तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावी तील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी ,यांना एक हजार एक रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कु.गौरी महादेव हांडे ही 97.31 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला .त्याचबरोबर इयत्ता बारावीतील कु.पूजा आनंदराव बेडकुते या विद्यार्थीनीने इयत्ता बारावी सायन्स मधून 92 टक्के गुण मिळवून प्रथम आली त्याबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रथम संपतराव दिरंगे सर यांनी स्व. दिरंगे गुरुजी यांच्या कार्याचा अल्पपरिचय देऊन त्यांच्या स्मृती जतन ठेवाव्यात तसेच त्यांनी जे शैक्षणिक व सामाजिक कार्य केले आहे त्यांना उजाळा देऊन येथून पुढे जे विद्यार्थी गावामध्ये प्रथम येतील त्यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे असे संपतराव दिरंगे यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी सरपंच दादासाहेब, , भांडवलकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष गफूर मुलाणी ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास हांडे , मुख्याध्यापक घाडगे सर सर्व शिक्षक स्टॉप त्याचबरोबर सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक गोडगे सर व सर्व शिक्षक तसेच धनंजय दिरंगे, नागनाथ गात, व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, पालक हे सर्व उपस्थित होते .