शेलगाव शाळेत दुरून येणाऱ्या विद्यार्थिनींना सायकली भेट

करमाळा : ग्रामीण भागात शाळा दूर असल्याने विद्यार्थिनींना येण्या जाण्याच्या होणाऱ्या त्रासामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये या दृष्टिकोनातून सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या सायकल बँक संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव(वांगी) या शाळेतील शिक्षकांनी ग्रामस्थांना आवाहन केले होते.

यानंतर शेलगाव (वांगी) येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव पवार व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ब्रम्हदेव केकान यांनी शाळेतील विद्यार्थिनीसाठी २ सायकली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेस भेट दिल्या. याचबरोबर डॉ. संदीप पाटील यांनी देखील पाच सायकली देण्याचे जाहीर केले आहे.

यावेळी सरपंच अमर ठोंबरे, उपसरपंच चंद्रकांत केकान, ठोकळ सर, तंटामुक्त अध्यक्ष वसंत केकान, पोलीस पाटील नवनाथ केकान, नागनाथ केकान व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, केंद्रप्रमुख आजिनाथ तोरमल आदींनी केले. यावेळी मुख्याध्यापक संजयकुमार वाघमारे, श्रीकृष्ण काळेल, कृष्णा आदलिंग, संतोष वाघमोडे, तात्यासाहेब जगताप, शंकर आदलिंग, मीनाक्षी कात्रेला, सुनीता जाधव व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!