शाळेच्या विकासासाठी पालकांनी योगदान द्यावे – प्रा .गणेश करे पाटील

करमाळा/संदेश प्रतिनिधी


करमाळा,ता.२४ : शाळेच्या विकासासाठी सर्वांनी सहयोग द्यावे, असे आवाहन यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यांनी केले.
वैद वस्ती (देवळाली ) शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

जि.प.प्रा शाळा . वैदवस्ती (देवळाली ) येथे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सरपंच सौ.अश्विनी धनंजय शिंदे , माजी सरपंच आशिष गायकवाड व सदस्य ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पडवळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.

यावेळी श्री करे-पाटील यांनी शाळेला एक स्मार्ट टीव्ही भेट दिला. त्यांनी विद्यार्थी व पालकांचे कौतूक केले. तसेच वैदू समाज मित्रमंडळ यांचे वतीने शाळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प भेट दिले . वार्षिक स्नेह संमेलनासाठी पालकांची उपस्थिती व प्रतिसाद उत्स्फूर्त होता . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रफुल्लता सातपुते तसेच श्री शांतीलाल खाडे यांनी परिश्रम घेतले . .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!