उमरड येथे रात्रीत सहा विद्युत मोटारींची चोरी - शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण - Saptahik Sandesh

उमरड येथे रात्रीत सहा विद्युत मोटारींची चोरी – शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : काल रात्री (दि.२३) उमरड (ता.करमाळा) येथे उजनीधरण काठावर चरीवरील तब्बल सहा विद्युत मोटारींची वायर चोरट्यांनी चोरी केली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या चोरीनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात सुनील बदे,मनोहर बदे,दत्ता बदे,महादेव मिसाळ, सुरेश कोठावळे, तानाजी कोठावळे या शेतकऱ्यांची चोरी झाली आहे.धरणाच्या फुगवटयावर असलेल्या उमरडच्या शेतकऱ्यांना मोठ्या कष्टाने पाणी मिळवावे लागते.पीके वाचवण्यासाठी दोन तीन मोटार व पाईपलाईन करून शेत बागायत करावे लागते मात्र काल रात्री चोरी झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतकऱ्यांना दुष्काळी परीस्थितीत पिके वाचवणे हे आव्हान असताना चोरीचे प्रकार घडत आहेत तरी पोलीस प्रशासनाने यात लक्ष घालून चोरांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!